Major destruction on Earth in 2032
Edited Image
Major Destruction on Earth in 2032: शास्त्रज्ञांनी अलीकडेच 2024 YR4 हा लघुग्रह शोधला आहे. या लघुग्रहाची लांबी 130 ते 399 फूट दरम्यान असल्याचे म्हटले जातं आहे. 22 डिसेंबर 2032 रोजी हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो की नाही याचा खगोलशास्त्रज्ञ सतत अभ्यास करत आहेत. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, त्याची टक्कर होण्याची शक्यता कमी किंवा जास्त वर्तवण्यात येत आहे. 29 जानेवारी रोजी या लघुग्रहाची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 1.3% होती, जी 1 फेब्रुवारी रोजी वाढून 1.7% झाली. दुसऱ्याच दिवशी ती 1.4% पर्यंत घसरली. यानंतर, ही शक्यता 8 फेब्रुवारी रोजी 2.3% पर्यंत पोहोचली आणि नंतर 9 फेब्रुवारी रोजी 2.2% झाली. तथापि, याचा अर्थ असा नाही की, हा लघुग्रह पृथ्वीवर आदळेल.
हेही वाचा - Infosys ने 'हे' कारण देत शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ!
नासाचे शास्त्रज्ञ डेव्हिड फार्नोचिया यांच्या मते, जरी अलिकडच्या गणनेमुळे संभाव्यता दुप्पट झाली असली तरी ती वाढत राहणार नाही. नासाचे सेंटर फॉर निअर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे (ESA) निअर-अर्थ ऑब्जेक्ट कोऑर्डिनेशन सेंटर (NEOCC) या लघुग्रहाची कक्षा निश्चित करण्यासाठी एकत्र काम करतात. या संस्था लघुग्रहाचा वेग, कक्षा आणि पृथ्वीच्या जवळची गणना करण्यासाठी स्काउट, सेंट्री (नासा) आणि मीरकॅट, एजिस (ईएसए) सारख्या प्रगत सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत.
हेही वाचा - Online Shopping करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 5 वर्षांच्या बंदीनंतर 'हे' चिनी शॉपिंग अॅप्स भारतात वापरण्यास परवानगी
कोणताही नवीन लघुग्रह सापडल्यानंतर शास्त्रज्ञ त्याच्या संभाव्य कक्षांचे नकाशे तयार करतात. काही कक्षा पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता दर्शवितात, तर बहुतेक पृथ्वीपासून दूर असतात. सुरुवातीच्या गणनेत उच्च अनिश्चितता असते, ज्यामुळे टक्कर होण्याची शक्यता तात्पुरती वाढू शकते. परंतु जसजसा अधिक माहिती गोळा केली जाते तसतसे गणना अधिक अचूक होते.
सध्या काळजी करण्याची गरज नाही -
सध्या या नव्या लघुग्रहाच्या नकाशानुसार, 4 एप्रिल 2025 पर्यंतचा डेटा पाहिले जाऊ शकतो. त्यानंतर तो ग्रह खूप दूर जाईल आणि 2028 पर्यंत पुन्हा दिसणार नाही. शास्त्रज्ञांच्या मते, एप्रिलपर्यंत पुरेसा डेटा उपलब्ध होईल. त्यानंतर हे लघुग्रह पृथ्वीवर आदळेल की नाही, हे स्पष्ट होईल. त्यामुळे लोकांना सध्या काळजी करण्याची गरज नाही, असे ESA शास्त्रज्ञ जुआन लुईस कॅनो यांनी सांगितलं आहे.