List of Most Weak Passwords
Edited Image
List of Most Weak Passwords: सध्या सर्वत्र डिजिटल अॅप्सचा आणि इतर डिजिटल सेवांचा वापर वाढला आहे. प्रत्येकजण स्मार्टफोन, जीमेल, बँकिंग अॅप्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इतर अॅप्स सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गोपनीयता राखण्यासाठी पासवर्ड वापरतो. तथापि, पासवर्ड संरक्षित असूनही, अनेक वेळा आपले खाते हॅक होते आणि डेटा चोरीला जातो. हे केवळ आपण ठेवलेल्या कमकुवत पासवर्डमुळे घडते. जर तुम्ही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असाल आणि ऑनलाइन पैशांचे व्यवहारही करत असाल तर तुम्ही पासवर्ड संदर्भात थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे.
तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या अॅप्स, जीमेल, बँकिंग अॅप्समध्ये पासवर्ड काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. खरं तर, अलीकडेच सायबर सुरक्षेवर एक अभ्यास करण्यात आला आणि त्यात कमकुवत पासवर्डची माहिती देण्यात आली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कमकुवत घोषित केलेले पासवर्ड लाखो लोक वापरत आहेत. हे पासवर्ड हँकर्संना शोधणे अगदी सोपे होते.
हेही वाचा - मोबाईल फोनच्या Radiation मुळे मृत्यू होऊ शकतो का? WHO ने केला खुलासा
कमकुवत पासवर्ड करू शकतो मोठे नुकसान -
अभ्यासानुसार, हे पासवर्ड खूप कमकुवत आहेत, ज्यामुळे डेटा आणि गोपनीयतेचे उल्लंघन होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही हे पासवर्ड वापरत असाल तर तुम्ही ते ताबडतोब बदलले पाहिजेत. जर तुम्ही खालील पासवर्ड वापरत असाल तर हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर सहज प्रवेश करू शकतात. अभ्यासात उघड झालेले पासवर्ड अनेक वेळा हॅक करण्यात आले आहेत.
'हे' आहेत सर्वात कमकुवत पासवर्ड -
123456- वैयक्तिक डेटा चोरीच्या अंदाजे 5,02,03,085 घटनांमध्ये हा पासवर्ड वापरला गेला आहे.
123456789 - हा पासवर्ड अंदाजे 2,05,08,946 घटनांमध्ये आढळला आहे.
1234- डेटा उल्लंघनाच्या सुमारे 44,53,720 प्रकरणांमध्ये हा पासवर्ड आढळला आहे.
12345678- अभ्यासानुसार, हा पासवर्ड 98 लाखांहून अधिक वेळा हॅक करण्यात आला आहे.
12345- हा पासवर्ड हॅकर्सनी 50 लाख वेळा हॅक केला आहे.
password - हा एक सामान्य पासवर्ड आहे जो सुमारे 1 कोटी वेळा चोरीला गेला आहे.
111111 – हॅकर्सनी सुमारे 54 लाख हा पासवर्ड वापरून हॅकींगच्या घटना केल्या.
admin - हॅकर्सनी हा पासवर्ड सुमारे 50 लाख वेळा हॅक केला आहे.
123123 - हा पासवर्ड हॅकर्सनी सुमारे 43 लाख वेळा हॅक केला आहे.
abc123- हा पासवर्ड अंदाजे 42 लाख वेळा हॅक करण्यात आला.
जर तुम्ही बँकिंग अॅप्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या यादीत समाविष्ट असलेला कोणताही पासवर्ड वापरत असाल, तर तुम्ही तो ताबडतोब बदला. हे इतके सोपे पासवर्ड आहेत की सायबर गुन्हेगार ते अगदी कमी वेळात हँक करू शकतात आणि तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतात.
हेही वाचा - Elon Musk यांना मोठा धक्का! Starship Rocket मध्ये प्रक्षेपणानंतर स्फोट; आकाशातून पडू लागले आगीचे गोळे, पहा व्हिडिओ
पासवर्ड तयार करताना घ्या 'ही' काळजी -
तुम्ही जेव्हा एखादा पासवर्ज वापरता तेव्हा तो खूप मजबूत आणि अद्वितीय असावा. शक्यतो कधीही लहान पासवर्ड ठेवणे टाळा. तुमच्या पासवर्डमध्ये कधीही अशी माहिती समाविष्ट करू नका जी इतरांना माहिती असू शकते. एवढेच नाही तर सुरक्षित पासवर्ड तयार करताना, विशेष अक्षरे नक्कीच वापरा, ज्यामुळे तुमचा पासवर्ड आणखी मजबूत होण्यास मदत होते.