Infosys Work From Office Policy
Edited Image
Infosys Work From Office Policy: इन्फोसिसने पुन्हा एकदा घरातून काम करण्याचे धोरण बदलले आहे. आता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नवीन मेल पाठवला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, आता महिन्यातून 10 दिवस ऑफिसमधून काम करणे बंधनकारक असेल. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने कॅम्पसमधील उपस्थिती वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. इन्फोसिस नेहमीच तिच्या हायब्रिड मॉडेलसाठी चर्चेत असते, परंतु आता कंपनीने एक नवीन नियम लागू करत असून घरून काम करणाऱ्यांवर अधिक निर्बंध लादत आहे.
कर्मचाऱ्यांना 10 दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करावे लागणार -
इन्फोसिसच्या या बदललेल्या नियमांनुसार, जर तुम्ही इन्फोसिसचे कर्मचारी असाल तर तुम्हाला महिन्यातून 10 दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करावे लागेल. कंपनीने घोषणा केली आहे की, ती त्यांच्या उपस्थिती सॉफ्टवेअरमध्ये बदल करत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 10 दिवस कार्यालयातून काम करावे लागेल. हे नवीन धोरण 10 मार्च 2025 पासून लागू होईल. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, इन्फोसिसच्या या नवीन नियमानुसार, कर्मचारी घरून काम करू शकतील अशा दिवसांची संख्या मर्यादित असेल.
हेही वाचा - Menstrual Leave: महिला दिनानिमित्त L&T Chairman SN Subrahmanyan यांचे कंपनीतील महिलांना खास गिफ्ट; आता दरमहा मिळणार मासिक पाळीची रजा
इन्फोसिसचे हे नवीन धोरण अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कॅम्पसमध्ये बोलावण्याच्या उद्देशाने बनवण्यात आले आहे. कंपनीने त्यांच्या कार्यकारी प्रमुखांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, '10 मार्च 2025 पासून, कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचा कालावधी मर्यादित करण्यासाठी सिस्टममध्ये बदल केले जातील. नवीन हायब्रिड वर्क मॉडेलचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना लवचिकता प्रदान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.'
हेही वाचा - PM Internship Scheme 2025 Registration: पीएम इंटर्नशिपसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करू शकता
कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?
इन्फोसिस या नियमाचा थेट परिणाम जॉब लेव्हल 5 (JL5) आणि त्याखालील काम करणाऱ्या 3.23 लाख इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर होईल. यामध्ये टीम लीडर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, वरिष्ठ इंजिनिअर, सिस्टम इंजिनिअर आणि सल्लागार यांचा समावेश आहे.