Thursday, March 13, 2025 02:15:44 PM

Elon Musk यांना मोठा धक्का! Starship Rocket मध्ये प्रक्षेपणानंतर स्फोट; आकाशातून पडू लागले आगीचे गोळे, पहा व्हिडिओ

elon musk यांना मोठा धक्का starship rocket मध्ये प्रक्षेपणानंतर स्फोट आकाशातून पडू लागले आगीचे गोळे पहा व्हिडिओ
SpaceX Starship Explodes In Space
Edited Image

SpaceX Starship Explodes In Space: एलोन मस्क यांना त्यांच्या अंतराळ मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. स्पेसएक्सचे प्रचंड मोठे रॉकेट स्टारशिपचा टेक ऑफनंतर काही वेळातच आकाशात स्फोट झाला. त्याचे तुकडे अग्निगोळ्यांच्या रूपात पृथ्वीवर पडू लागले. स्टारशिपचे हे आठवे चाचणी उड्डाण होते. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच, स्टारशिपचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. यामुळे रॉकेटचे इंजिन बंद पडले आणि स्टारशिप रॉकेटचा आकाशात स्फोट झाला. स्पेसएक्सचे स्टारशिप रॉकेट उड्डाणानंतर काही मिनिटांतच आगीच्या गोळ्यात बदलले. आकाशात रॉकेटच्या स्फोटाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मस्कने त्याच्या अधिकृत हँडलवरून त्याचा व्हिडिओही शेअर केला.  

हेही वाचा - 24 तासांत बदलले मुकेश अंबानींचे नशीब! एलोन मस्कला मागे टाकून बनले जगातील सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती

रॉकेटच्या स्फोटानंतर पृथ्वीवर पडले अवशेष, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, स्पेसएक्सचे म्हणणे आहे की, रॉकेटचा स्फोट झाला असला तरी, चाचणी पूर्णपणे अयशस्वी झाली नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लाँचिंग दरम्यान त्यांनी सुपर हेवी बूस्टरवर यशस्वीरित्या काम केले आणि कंपनीला त्याबद्दल खूप महत्त्वाचा डेटा मिळाला आहे. स्पेसएक्सने टेक्सासमधील बोका चिका येथील लाँच पॅडवरून स्टारशिप लाँच केले होते.

हेही वाचा - Elon Musk Girlfriend Shivon Zilis: एलोन मस्कची गर्लफ्रेंड शिवॉन कोण आहे? जिने मस्कच्या 14 व्या मुलाला दिला जन्म

उड्डाणादरम्यान सुरुवातीला सर्व काही सामान्य होते. पण प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच स्पेसएक्स आणि स्टारशिपमधील संपर्क तुटला. अंतराळात प्रवेश करण्यापूर्वीच, स्टारशिप नियंत्रणाबाहेर गेली आणि स्फोट झाला, ज्यामुळे मोहीम अपूर्ण राहिली. जेव्हा हे स्पेसएक्स रॉकेट आकाशात स्फोट झाले तेव्हा रॉकेट प्रक्षेपणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होते. यावेळी लोक व्हिडिओही बनवत होते. या घटनेमुळे जवळच्या अनेक विमानतळांवरील हवाई सेवाही काही काळासाठी विस्कळीत झाली.
 


सम्बन्धित सामग्री