नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना आज होणार आहे. भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार आहेत. भारताला तब्बल 25 वर्षांनंतर हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. भारताचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची वेळ आली आहे. भारतीय संघ आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
चॅम्पियन ट्राफीचे विजेते
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 1998 साली दक्षिण अफ्रिका विरूद्ध बांग्लादेश असा सामना झाला होता. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली होती. त्यानंतर 2000 साली सुद्धा भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. यानंतर आता पुन्हा 2025 मध्ये भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्यामुळे भारताला तब्बल पंचवीस वर्षांनंतर बदला घेण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा : IND Vs NZ फायनलचा थरार! सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येईल?
2002 मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका सामना झाला. यात दोन्ही देशाचे संघ संयुक्त विजेते झाले होते. 2004 साली वेस्टइंडीज आणि इंग्लंड या दोन देशांत अंतिम लढत झाली होती. यात वेस्टइंडीजने बाजी मारली होती. यानंतर 2006 साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्टइंडीज या देशांमध्ये अंतिम लढत झाली. यात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद भूषविले होते. तर वेस्टइंडीजने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2009 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड सामना झाला. यात सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळविले होते. 2013 मध्ये भारत विरूद्ध इंग्लंड सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने देशाचे नाव सुवर्ण अक्षरांवर कोरले. तर इंग्लंडला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.
2017 मध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामना झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तान विजयी झाला होता. आणि भारताला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले होते. याही वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान पाकिस्तान विरूद्ध भारत असा सामना झाला होता. या सामन्यात भारताला दणदणीत विजय झाला होता. त्यानंतर मॅच जिंकत सेमिफायनलमध्ये गेली आणि आता फायनलमध्ये गेली आहे. आज भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सामना होणार आहे. या सामन्यात काय होणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे.