Wednesday, February 12, 2025 01:18:37 AM

'This' Player Ruled Out From Champions Trophy
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' संघाचा कर्णधार दुखापतग्रस्त

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या संघाचा कर्णधार दुखापतग्रस्त

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार चॅम्पियन्स ट्रॉफीमधून दुखापतीमुळे बाहेर पडलेला आहे. पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाला पॅट कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली 2023 चे एकदिवशीय विश्वचषक जिंकून दिल होतं. त्याच बरोबर कमिन्सने 2023ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदेखील जिंकवून दिली होती. 

पॅट कमिन्सचा सहकारी गोलंदाज जोश हेझलवूडदेखील चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जोश हेझलवूड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचा सहभाग नोंदवू शकलेला नाही आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट मालिकादेखील हजेलवूड पूर्णपणे खेळू शकलेला नव्हता. 

पॅट कमिन्स आणि हेजलवूड यांचा सोबत अजून 2 खेळाडू ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळताना दिसणार नाही आहेत. ऑस्ट्रेलियाचे 2 अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला पण पाठीची दुखापत झाली आहे, तर मार्कस स्टोइनीसने आंतरराष्ट्रीय एकदिवीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या सर्व मुख्य खेळाडूंच्या गैरहजेरीने ऑस्ट्रेलिया संघ दुबळा दिसत आहे. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचं आयसीसी स्पर्धांमधील प्रदर्शन बघता ऑस्ट्रेलियाला हल्ल्यात आखणं अयोग्य ठरेल. 

शॉन ऍबॉट, कूपर कनोली, बेन डॉरविशीअस, जेक फ्रेसर मॅकगर्ग आणि तन्वीर संघा या खेळाडूंना सध्यातरी संघात सामील केले आहे. हे खेळाडू 12 फेब्रुवारीपासून  श्रीलंका संघाविरुद्ध सुरु होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी निवडले गेले आहेत. मात्र, यातील  फक्त 4 खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात दिसणार आहेत.   


सम्बन्धित सामग्री