गकेबरहा : दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धची दुसरी टी ट्वेंटी मॅच तीन गडी राखून जिंकली आणि चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने वीस षटकांत सहा बाद १२४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने १९ षटकांत सात बाद १२८ धावा करत सामना जिंकला. याआधी किंग्समेड, डरबन येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. पहिल्या सामन्यात भारताचा संजू सॅमसन आणि दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स सामनावीर झाला. डरबन येथील सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत आठ बाद २०२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने १७.५ षटकांत सर्वबाद १४१ धावा केल्या होत्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चार सामन्यांची टी २० मालिका
- शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ - पहिला सामना - किंग्समेड, डरबन - भारताचा ६१ धावांनी विजय
- रविवार १० नोव्हेंबर २०२४ - दुसरा सामना - सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा - दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून विजय
- बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ - तिसरा सामना - सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरिअन - थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून
- शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४ - चौथा सामना - वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग - थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून