Monday, September 09, 2024 03:24:59 PM

Paris Olympics Controversy
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात

पॅरिस ऑलिम्पिक आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक आता नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इटलीच्या अँजेला कॅरिनीला अल्जेरियाच्या इमान खलिफ या तृतीयपंथीने मुष्टीयुद्धात पराभूत केले. इमान खलिफ या तृतीयपंथी खेळाडूने मुष्टीयुद्धात प्रतिस्पर्धी असलेल्या अँजेला कॅरिनी हिचे नाक फोडले. त्यामुळे अँजेला कॅरिनी जखमी झाली. यावरून पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या कचाट्यात सापडले आहे. तृतीयपंथीयाचा मुष्टीयुद्धातील समावेशावरून वाद निर्माण झाला आहे.

जन्मापासून पुरूष असलेल्या आणि नंतर तृतीयपंथी झालेल्या खलिफच्या ऑलिम्पिक समावेशावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. एका जन्मत: पुरूष असलेल्या तृतीयपंथीला मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला गटातील समावेशाने एका महिलेचे नुकसान झाले. त्यामुळे जन्मत: पुरूष असलेल्या व्यक्तीला ऑलिम्पिकमधील महिला गटातील समावेशाची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. परंतु अद्याप पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून यावर काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.

 

 

 


सम्बन्धित सामग्री