Thursday, January 02, 2025 11:26:54 PM

India vs New Zealand
मुंबई कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडला आघाडी

वानखेडे स्टेडियम येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १४३ धावांची आघाडी घेतली.

मुंबई कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडला आघाडी

मुंबई : वानखेडे स्टेडियम येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १४३ धावांची आघाडी घेतली. मुंबई कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २३५ धावा केल्या. यानंतर भारताने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नऊ बाद १७१ धावा केल्या. आता न्यूझीलंडची शेवटची जोडी मैदानात आहे. 

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे मालिका भारताने २ - ० अशी गमावली आहे. मुंबईतली कसोटी जिंकून भारत किमान थोडी तरी प्रतिष्ठा राखतो की नाही याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. 

  1. भारत वि. न्यूझीलंड पहिली कसोटी, बंगळुरू - न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
  2. भारत वि. न्यूझीलंड दुसरी कसोटी, पुणे - न्यूझीलंडचा ११३ धावांनी विजय
  3. भारत वि. न्यूझीलंड दुसरी कसोटी, मुंबई - शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू, थेट प्रक्षेपण सकाळी ९.३० पासून

भारत : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज , कुलदीप यादव, केएल राहुल

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके, जेकब डफी, इश सोधी, मॅट हेन्री, मार्क चॅपमन


सम्बन्धित सामग्री