Saturday, March 22, 2025 11:57:06 AM

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही ?

१९ फेब्रुआरीपासून सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, बांगलादेश विरुद्ध असेल भारताचा पहिला सामना

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही

मुंबई: चॅम्पयन्स ट्रॉफी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व संघानी आपापले संघ घोषितदेखील केले आहेत. भारताने  १५ खेळाडूंचा संघ जाहीर करून महिना होत आला आहे. यात, जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेवर प्रश्न चिन्ह कायमच आहे. 

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. हा सामना जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. त्यानंतर जसप्रीत एकही सामना खेळलेला नाही. जसप्रीत बुमराह हा त्याच्या कारकिर्दीत पाठीच्या दुखापतीने त्रस्त राहिला आहे. या दुखापतींमुळे तो जवळपास २ वर्ष क्रिकेटला मुकला होता. 

जसप्रीत बुमराह खेळणार की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सध्या बुमराह नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत. इथे बुमराहची एकंदरी तब्येत कशी यावरून हा निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रानुसार बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याने सर्व सत्रांमध्ये चांगला फिटनेस दाखवला आहे. बुमराह संघात असणे भारतीय संघासाठी खूप गरजेचे आहे. कारण बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे आणि सध्याचा घडिताला विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. त्याचेकडे नवीन आणि जुन्या चेंडूने बळी घेण्याच्या क्षमता असल्याने फलंदाजसाठी तो धोकादायक ठरतो. 

रिलायन्स ग्रुपकडून अजून एक संघ खरेदी

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शमीच्या गोलंदाजीत लय दिसली नाही. ही भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अजून तरी अर्षदिप सिंगला अजून संघात मिळाले नाहीये. अर्षदिपची  टी २० क्रिकेटमधील गोलंदाजीची लय चांगली दिसली आहे. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अर्षदिप एकदिवसीय क्रिकेटमध्ये करेल अशी भारतीय संघ व्यापस्थापनाची अपेक्षा राहील. 

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा.
 


सम्बन्धित सामग्री