Wednesday, March 12, 2025 10:29:13 AM

IPL 2025 : RCB चा नवा कर्णधार कोण?, विराट ऐवजी ‘या’ खेळाडूकडं कमान!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. रजत पाटीदारकडे RCB संघाचे नेतृत्व सोपण्यात आलं आहे.

ipl 2025  rcb चा नवा कर्णधार कोण विराट ऐवजी ‘या’ खेळाडूकडं कमान
IPL 2025 : RCB चा नवा कर्णधार कोण?, विराट ऐवजी ‘या’ खेळाडूकडं कमान!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. रजत पाटीदारकडे RCB संघाचे नेतृत्व सोपण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विराट कोहली देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत होता. परंतु संघ व्यवस्थापनाने पाटीदार यांच्या नावाला पसंती देत निवड केली आहे.  

रजत पाटीदार 2021 पासून आरसीबी संघाशी जोडला गेलेला आहे. तो आरसीबी संघाचे प्रतिनिधीत्व करणारा आठवा कर्णधार ठरला आहे. 2021 हंगामानंतर त्याला संघातून रिलीज करण्यात आले होते. परंतु 2022 मध्ये पुनः आरसीबीने पाटीदार याला संघात सामील करून घेतले होते.
 

लखनऊ सुपरजायंटविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने नाबाद 112 धावांची खेळी केली होती. तो प्ले ऑफ सामन्यात शतक करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. 2024 चा आयपीएल हंगाम पाटीदारसाठी चांगला ठरला. या हंगामात त्याने 15 सामन्यांमध्ये खेळताना 395 धावा केल्या होत्या. ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

कर्णधार पद भूषवण्याचा अनुभव 

मध्य प्रदेशच्या संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव रजत पाटीदार याच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम सामन्यात त्यांना मुंबईकडून पराभव पत्कारावा लागला होता. या स्पर्धेत खेळताना रजत पाटीदार याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

आरसीबीने 2025 हंगामासाठी पाटीदार, कोहली आणि यश दयाल यांना रिटेन केले आहे. 2022 पासून फाफ डु प्लेसिस संघाचे नेतृत्व करत होता. परंतु मेगा लिलावापूर्वी त्याला आरसीबीने संघातून रिलीज केले आहे. आता तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणार आहे.

आरसीबीने अद्याप एकही आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही. पण ते तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. आरसीबीने 2024 हंगामात लीगच्या शेवटच्या सहा सामन्यांमध्ये सलग विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. परंतु एलिमिनेटरमध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला.

दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी अद्याप त्यांच्या नवीन कर्णधारांची घोषणा केलेली नाही. त्यांचा मागील हंगामातील कर्णधार श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार आहे. तर दिल्लीचा ऋषभ पंत लखनऊ सुपरजायंटचे कर्णधार झाला आहे.

 


सम्बन्धित सामग्री