Sunday, December 22, 2024 11:48:43 AM

India vs Bangladesh
अर्शदीप सामनावीर, भारताचा विजयाने शुभारंभ

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वीस वीस षटकांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. मालिकेतील तीन पैकी पहिला सामना जिंकत भारताने छान सुरुवात केली.

अर्शदीप सामनावीर भारताचा विजयाने शुभारंभ

ग्वाल्हेर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वीस वीस षटकांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. मालिकेतील तीन पैकी पहिला सामना जिंकत भारताने छान सुरुवात केली. ग्वाल्हेर येथे झालेल्या या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला. अवघ्या १४ धावा देत बांगलादेशच्या तीन फलंदाजांना बाद करणारा अर्शदीप सामनावीर झाला. 

नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे भारतासाठी फायद्याचे ठरले. भारताने १९.५ षटकांत बांगलादेशचा डाव १२७ धावांत गुंडाळला. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ११.५ षटकांत ३ बाद १३२ धावा करत सामना जिंकला. 

भारत विरुद्ध बांगलादेश
पहिला वीस वीस षटकांचा सामना
बांगलादेश १९.५ षटकांत सर्वबाद १२७ धावा
भारत ११.५ षटकांत तीन बाद १३२ धावा
भारताचा सात गडी राखून विजय, मालिकेत १ - ० अशी आघाडी

बांगलादेशची फलंदाजी - परवेझ हुसेन इमॉन ८ धावा, लिटन दास ४ धावा, नजमुल हुसेन शांतो २७ धावा, तौहीद हृदोय १२ धावा, महमुदुल्ला एक धाव, जाकर अली आठ धावा, मेहदी हसन मिराज नाबाद ३५ धावा, रिशाद हुसेन ११ धावा, तस्किन अहमद धावचीत १२ धावा, शरीफुल इस्लाम शून्य धावा, मुस्तफिझूर एक धाव.
भारताची गोलंदाजी - अर्शदीप सिंग १४ धावा देत ३ बळी, वरुण चक्रवर्ती ३१ धावा देत ३ बळी, मयंक यादव २१ धावा देत एक बळी, वॉशिंग्टन सुंदर १२ धावा देत एक बळी आणि हार्दिक पांड्या २६ धावा देत एक बळी
भारताची फलंदाजी - संजू सॅमसन २९ धावा, अभिषेक शर्मा धावचीत १६ धावा, सूर्यकुमार यादव २९ धावा, नितीश रेड्डी नाबाद १६ धावा आणि हार्दिक पांड्या नाबाद ३९ धावा
सामनावीर - अर्शदीप

भारत - बांगलादेश टी - २० मालिका २०२४
प्रत्येक सामन्याचे संध्याकाळी सात वाजल्यापासून थेट प्रक्षेपण
पहिला सामना - रविवार ६ ऑक्टोबर - ग्वाल्हेर, नवे माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियम - भारताचा सात गडी राखून विजय
दुसरा सामना - बुधवार ९ ऑक्टोबर - दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम
तिसरा सामना - शनिवार १२ ऑक्टोबर - हैदराबाद, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo