Friday, October 18, 2024 11:35:02 AM

India vs Zimbabwe
भारत - झिम्बाब्वे आमनेसामने

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका होणार आहे. एकूण पाच सामने खेळवले जातील.

भारत - झिम्बाब्वे आमनेसामने
Shubman Gill, India

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका होणार आहे. एकूण पाच सामने खेळवले जातील. या मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार शनिवार ६ जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून हरारे येथे सुरू होत आहे. या मालिकेत भारताने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. भविष्यातील संघ तयार करण्यासाठी हा प्रयोग सुरू आहे. 

भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे , हर्षित राणा

झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), इनोसंट काया, वेस्ली माधेवेरे, ल्यूक जोंगवे, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा, ब्रँडन माय चतारा, डी. , फराज अक्रम, अंतुम नक्वी

भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेचे भारतीय वेळेनुसार वेळापत्रक
झिम्बाब्वेत पाच वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका

  1. पहिला सामना - हरारे - शनिवार ६ जुलै २०२४ - संध्याकाळी ४.३० पासून
  2. दुसरा सामना - हरारे - रविवार ७ जुलै २०२४ - संध्याकाळी ४.३० पासून
  3. तिसरा सामना - हरारे - बुधवार १० जुलै २०२४ - संध्याकाळी ४.३० पासून
  4. चौथा सामना - हरारे - शनिवार १३ जुलै २०२४ - संध्याकाळी ४.३० पासून
  5. पाचवा सामना - हरारे - रविवार १४ जुलै २०२४ - संध्याकाळी ४.३० पासून
                 

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo