Wednesday, March 26, 2025 11:53:08 AM

IPL इतिहासातील बेस्ट ११ खेळाडू, गिलख्रिस्टच्या संघात कोणाला स्थान ?

एडम गिलख्रिस्ट याने आयपीएल इतिहासातील आपला सर्वोत्तम इलेव्हन संघ जाहीर केला आहे. त्यांच्या संघात त्याने एका ऑस्ट्रेलियन खेळाडूलाही स्थान दिलेले नाही.

ipl इतिहासातील बेस्ट ११ खेळाडू गिलख्रिस्टच्या संघात कोणाला स्थान
IPL इतिहासातील बेस्ट ११ खेळाडू, गिलख्रिस्टच्या संघात कोणाला स्थान ?

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज एडम गिलख्रिस्ट याने आयपीएल इतिहासातील आपला सर्वोत्तम इलेव्हन संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या संघात त्याने एका ऑस्ट्रेलियन खेळाडूलाही स्थान दिलेले नाही. त्याने आपल्या संघात सात भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. उर्वरित खेळाडू वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या आहेत.

गिलख्रिस्टने ओपनिंगसाठी ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांना निवडले आहे. आयपीएलमध्ये दोघांनी मिळून अनेक शानदार खेळी केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. चौथ्या स्थानी गिलख्रिस्टने ‘मिस्टर IPL’ सुरेश रैना याला निवडलं आहे.

हेही वाचा -  MI Won WPL २०२५ : मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन, दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

पाचव्या क्रमांकावर गिलख्रिस्टने आयपीएलचा ‘मिस्टर 360 डिग्री’ एबी डिविलियर्सला पसंती दिली आहे. गिलख्रिस्टने यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनी याला निवडले आहे. तसंच गिलख्रिस्टने धोनीकडं संघाचं नेतृत्व दिलं आहे. 

हेही वाचा -  Virat Kohli : विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार? भविष्याचा प्लॅन उघड करत दिले निवृत्तीचे संकेत


गिलख्रिस्टने आपल्या संघात रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्रावो या अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिले आहे. तर गिलख्रिस्टने युजवेंद्र चहलला प्रमुख फिरकीपटू म्हणून निवडले आहे. चहल हा IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मानला जातो. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांना गिलख्रिस्टने पसंती दिली आहे.  

राशिद खान १२ वा खेळाडू
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला गिलख्रिस्टने १२व्या खेळाडूच्या रूपात निवडले आहे. राशिदने आयपीएलमध्ये आपल्या लेगस्पिनने अनेक फलंदाजांना हैराण केले आहे. तसेच तो फलंदाजीत देखील आपलं योगदान देतो.  

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना का वगळलं?
गिलख्रिस्टने त्याच्या संघात एका ऑस्ट्रेलियन खेळाडूलाही स्थान दिलेले नाही. डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क यांसारख्या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली आहे. तरीदेखील गिलख्रिस्टने त्यांना आपल्या संघात स्थान दिलेले नाही. 

एडम गिलख्रिस्टने निवडलेला संघ 
ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिविलियर्स, एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, युजवेंद्र चहल, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह, राशिद खान  
 


सम्बन्धित सामग्री