Thursday, June 27, 2024 08:23:11 PM

टीम डेव्हिडच्या षटकाराने फॅन गंभीर दुखापत

टीम डेव्हिडच्या षटकाराने फॅन गंभीर दुखापत

दिल्ली, २८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात एक वाईट घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई इंडियन्स संघातील आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडने षटकार मारला, हा चेंडू स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या फॅनला जाऊन लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी सुरु असताना १४ व्या षटकात ही घटना घडली. हे षटक टाकण्यासाठी खलील अहमद गोलंदाजीला आला होता. त्यावेळी टीम डेव्हिड फलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर टिम डेव्हिडने गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार त्याने काऊ कॉर्नरच्या दिशेने मारला. सामना पाहण्यासाठी आलेल्या एका फॅनने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तो दुखापतग्रस्त झाला. हा चेंडू त्याला इतका जोरात लागला की, चेंडू लागताच रक्त आलं. त्याने रुमाल काढला आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड त्याला उपचार करण्यासाठी बाहेर घेऊन जातात. हा चेंडू इतका जोरात लागला होता की, तो फॅन वेदनेने विवळत होता. या सामन्यात टीम डेव्हिडने १७ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र त्याची ही खेळी मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. हा सामना मुंबई इंडियन्स संघाला १० धावांनी गमवावा लागला आहे.


सम्बन्धित सामग्री