Thursday, June 27, 2024 08:28:42 PM

युझवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी

युझवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी

जयपूर, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल हा आयपीएलमधील २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज आहे. याआधी आयपीएलमध्ये ही कामगिरी कोणीही केलेली नाही. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या युझवेंद्रने २०० वा बळी जयपूरच्या सवाई मानसिंह क्रिकेट स्टेडियममध्ये घेतला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ऐतिहासिक कामगिरी केली.

युझवेंद्र चहलने मुंबई विरुद्धच्या दुसऱ्याच चेंडूवर बळी घेत इतिहास रचला. त्याने मोहम्मद नबी बाद केले. नबी सोपा झेल देत तंबूत परतला. युझवेंद्र चहलने १५३ सामन्यात २०० बळी घेतले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेतलेले गोलंदाज

युझवेंद्र चहल २०० बळी
ड्वेन ब्राव्हो १८३ बळी
पीयूष चावला १८१ बळी


सम्बन्धित सामग्री