Saturday, September 28, 2024 01:58:14 PM

ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार

ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार

चेन्नई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. आयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1770760276972810687

साधारणपणे आयपीएल संघाचा कर्णधार बदलला तर त्याची घोषणा फ्रँचायझी अर्थात संबंधित संघाचे व्यवस्थापन करते. पण चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार बदलला तरी त्याची घोषणा सीएसकेच्या व्यवस्थापनाने केली नाही. ही घोषणा थेट बीसीसीआयकडून करण्यात आली. हा प्रकार आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या व्यवस्थापनाने कर्णधार बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५२ सामन्यांत पाच वेळा नाबाद राहून एकूण १७९७ धावा केल्या आहेत. यात नाबाद १०१ ही त्याची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने आयपीएलमध्ये एक शतक आणि चौदा अर्धशतके केली आहेत. आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडने ७३ षटकार आणि १५९ चौकार मारले आहेत. त्याने आयपीएलमध्ये ७३ षटकार मारले आहेत.


सम्बन्धित सामग्री