Saturday, September 28, 2024 02:03:32 PM

तब्बल १६ वर्षांनंतर आरसीबीकडे विजेतेपद

तब्बल १६ वर्षांनंतर आरसीबीकडे विजेतेपद

नवी दिल्ली, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमियर लीगच्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत पोहोचला होता, मात्र सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्याने त्याचे स्वप्न भंगलं. मात्र, आता स्मृती मानधनाने महिला संघाला महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून देत मोठा इतिहास रचला आहे. यामुळे आरसीबीच्या चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले आहे.

दरम्यान मागील वर्षी महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हाती निराशा आली होती. मागील वर्षी या संघाला वारंवार पराभवाला सामोरे जावे लागत होते. यामुळे एका सामन्याआधी विराट कोहलीने या संघांची भेट घेतली होती. मात्र यावर्षी त्यांनी थेट विजेतेपदावर नाव कोरत नवा इतिहास घडवला आहे. यानंतर आता विराट कोहली जे करू शकला नाही ते स्मृती मानधनाने करुन दाखवलं असं बोललं जात आहे.


सम्बन्धित सामग्री