Thursday, June 27, 2024 08:23:24 PM

'काहीही झालं तरी विराट पाहिजेचं' - रोहित शर्मा

काहीही झालं तरी विराट पाहिजेचं - रोहित शर्मा

मुंबई, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : आगामी टी २० विश्वचषकामध्ये भारतीय संघात विराट कोहलीला स्थान नसेल, या बातमीनं क्रीडा जगतात खळबळ माजवली होती. दिग्गज आजी-माजी क्रिकेटसरसह चाहत्यांनीही टीकेचा भडीमार केला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीची विश्वचषकातील आकडेवारीच टाकली होती. पण आता रोहित शर्माने विराट कोहलीसाठी फिल्डिंग लावली आहे. विश्वचषकात विराट कोहली हवाच, अशी भूमिका रोहित शर्माने बीसीसीआयपुढे मांडली आहे. यूएईमधील संथ खेळपट्टीवर विराट कोहलीला फलंदाजी करण्यास अडचण येते, त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचं प्रसारमाध्यमात समोर आले होते. आता रोहित शर्माच्या अल्टीमेटमनंतर बीसीसीआय विराट कोहलीबाबत काय निर्णय घेतेय? याकडे लक्ष लागलेय.

भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी रोहित शर्माच्या अल्टीमेटमवर स्पष्ट शब्दात ट्वीटवर पोस्ट केले आहे. ते म्हणाले की, टी २० विश्वचषकात विराट कोहली कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात हवाच आहे. असे रोहित शर्मानं बीसीसीआय सचिव जय शाह यांना स्पष्ट शब्दात सांगितलं. दरम्यान, माहितीनुसार बीसीसीआय विराट कोहलीला टी २० मध्ये घेण्याचा विचार करत नाही. कारण, मागील काही दिवसांमध्ये विराट कोहलीचा टी २० मधील फॉर्म तितका चांगला नाही.


सम्बन्धित सामग्री