Thursday, June 27, 2024 08:40:22 PM

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या अडचणीत वाढ

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या अडचणीत वाढ

दिल्ली, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : इंडियन प्रीमियर लीग २२ मार्चपासून सुरू होत आहे. या वर्षी लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएल दोन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. २२ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयसमोर आता निवडणुकीच्या काळात आयपीएलचे सामने कसे आयोजित केले जातील हे मोठे आव्हान आहे. भारतात आयपीएलच्या १७व्या हंगामाचा पहिला टप्पा २२ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ एप्रिलला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी सुरुवातीच्या वेळापत्रकासह कार्यक्रम नव्याने तयार करावा लागणार आहे. यापूर्वीही लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे देशाबाहेर आयोजन करण्यात आले आहे. मात्र, वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२४ चे सर्व सामने भारतातच होणार असल्याचे स्पष्ट केले होते.


सम्बन्धित सामग्री