Saturday, September 28, 2024 01:59:34 PM

गुजरात टायटन्सला मोठा झटका

गुजरात टायटन्सला मोठा झटका

नवी दिल्ली, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी : आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. २२ मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्याआधीच गुजरातच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या संघात गेल्यानंतर आणि मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर पडल्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. अशातच गुजरातचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या सतराव्या हंगामातून बाहेर झाला आहे.

आयपीएल २०२४ च्या लिलावात ३.६० कोटी रुपयांना विकला गेलेला रॉबिन मिंज अलीकडेच रस्ते अपघातात जखमी झाला होता. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या फ्रँचायझींसोबत चुरस झाल्यानंतर अखेर त्याला गुजरातने खरेदी केले. मिंज स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती आणि तो ३.६० कोटी रुपयांना विकला गेला. पण दुखापतीमुळे तो आगामी हंगामाला मुकणार आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितले की, रॉबिन मिंज दुखापतीतून अद्याप सावरला नाही, त्यामुळे तो आगामी हंगामासाठी उपलब्ध नसेल. त्याची कमी नक्कीच आम्हाला जाणवेल.


सम्बन्धित सामग्री