Tuesday, July 02, 2024 08:09:39 AM

आयपीएलचे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी

आयपीएलचे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी

बेंगळुरू,१३ मार्च २०२४, प्रतिनिधी : आयपीएलचा १७वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील सर्व संघांनी यासाठी तयारी देखील सुरू केली असून आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासंदर्भात आहे. आरसीबी संघाचे घरचे मैदान आणि शहर असलेल्या बेंगळुरू शहरात गेल्या चार दशकातील सर्वात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शहरात होणारे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी होत आहे.

आयपीएललच्या नव्या हंगामात बेंगळुरूचे सामने २५ मार्च, २९ मार्च आणि ०२ एप्रिल रोजी अनुक्रमे पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध होणार आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार शहरातील पाणी संकटाचा आयपीएलमधील पहिल्या ३ लढतींवर परिणाम होणार नाही. कारण चिन्नास्वामी स्टेडियमवरील सीवेज संयंत्राचे पाणी मैदानाच्या आउटफिल्ड आणि पिचसाठी वापरले जाणार आहे.

आरसीबीच्या पहिल्या टप्प्यातील सामने -

  • २२ मार्च- चेन्नई विरुद्ध बेंगळुरू- रात्री ८ वाजता, चेन्नई.
  • २५ मार्च- बेंगळुरू विरुद्ध पंजाब- रात्री ७.३० वाजता, बेंगळुरू
  • २९ मार्च- बेंगळुरू विरुद्ध कोलकाता- रात्री ७.३० वाजता, बेंगळुरू.
  • ०२ एप्रिल- बेंगलुरू विरुद्ध लखनौ- रात्री ७.३० वाजता, बेंगलुरू.
  • ०६ एप्रिल- राजस्थान विरुद्ध बेंगळुरू- रात्री ७.३० वाजता, जयपूर
              

सम्बन्धित सामग्री