Sunday, July 07, 2024 12:08:20 AM

पाचव्या कसोटीचा पहिला दिवस भारताचा

पाचव्या कसोटीचा पहिला दिवस भारताचा

धर्मशाळा, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा येथे सुरू आहे. या सामन्यातला पहिला दिवस भारताने गाजवला. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि इंग्लंडला डाव २१८ धावांत गुंडाळला. भारताकडून कुलदीप यादवने पाच तर आर. अश्विनने चार आणि आर. जडेजाने एक बळी घेतला. यानंतर भारताने चांगली सुरुवात केली. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांनी अर्धशतके केली. यामुळे भारताने सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडला.

भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवी कसोटी, धर्मशाळा
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय
इंग्लंड : सर्वबाद २१८ धावा
भारत : १ बाद १३५ धावा
पहिल्या दिवसाचा खेळ संपला
भारत ८३ धावांनी पिछाडीवर

भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

पहिली कसोटी - हैदराबाद - इंग्लंडचा २८ धावांनी विजय
दुसरी कसोटी - विशाखापट्टणम - भारताचा १०६ धावांनी विजय
तिसरी कसोटी - राजकोट - भारताचा ४३४ धावांनी विजय
चौथी कसोटी - रांची - भारताचा पाच गडी राखून विजय
पाचवी कसोटी - धर्मशाळा - गुरुवार ७ मार्च २०२४ पासून सुरू

           

सम्बन्धित सामग्री