Tuesday, July 02, 2024 09:00:30 AM

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना गुरुवार ७ मार्च २०२४ पासून हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा (धरमशाला) येथे सुरू होणार आहे. या सामन्यासाठी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला आहे.

पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी आधीच जिंकली आहे. पण पाचवा सामना जिंकून भारत जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेसाठी अधिकचे गुण मिळवतो की इंग्लंडचा संघ शेवटचा सामना जिंकतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

पहिली कसोटी - हैदराबाद - इंग्लंडचा २८ धावांनी विजय
दुसरी कसोटी - विशाखापट्टणम - भारताचा १०६ धावांनी विजय
तिसरी कसोटी - राजकोट - भारताचा ४३४ धावांनी विजय
चौथी कसोटी - रांची - भारताचा पाच गडी राखून विजय
पाचवी कसोटी - धर्मशाळा - गुरुवार ७ मार्च २०२४ पासून सुरू होणार

              

सम्बन्धित सामग्री