Saturday, July 06, 2024 11:31:44 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आमनेसामने

भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा आमनेसामने

जोहान्सबर्ग, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा आणि भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आतापर्यंत भारतीय संघ आठ वेळा आणि ऑस्ट्रेलियाचा संघ पाच वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तसेच दोन वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. आता तिसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. भारताने आतापर्यंत पाच वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. यामुळे रविवारी होणार असलेल्या अंतिम सामन्यात कोण जिंकणार याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. अंतिम सामना रविवार ११ फेब्रुवारी २०२३ रोजी विलोमूर पार्क, बेनोनी येथे होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० पासून सुरू होणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा
२०१२ - भारत विजेता, अंतिम सामना
२०१८ - भारत विजेता, अंतिम सामना
२०२४ - रविवार ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार

              

सम्बन्धित सामग्री