Saturday, July 06, 2024 11:00:59 PM

दुसरी कसोटी भारताने जिंकली, मालिकेत बरोबरी

दुसरी कसोटी भारताने जिंकली मालिकेत बरोबरी

विशाखापट्टणम, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी भारताने जिंकली. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने १०६ धावांनी विजय मिळवला. याआधी हैदराबाद येथे झालेली पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली. आता मालिकेत १ - १ अशी बरोबरी झाली आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवली जाणार आहे.

विशाखापट्टणमच्या कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३९६ धावा केल्या. या डावात भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक २०९ धावा केल्या होत्या. यानंतर भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत गुंडाळला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक सहा बळी घेतले. इंग्लंडला लवकर गुंडाळल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २५५ धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने सर्वाधिक १०४ धावा केल्या. अखेरच्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३९८ धावा करायच्या होत्या. त्यांनी सर्वबाद २९२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले.

बुमराह सामनावीर

इंग्लंडचे पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन फलंदाज बाद करणारा जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीचा सामनावीर झाला.


सम्बन्धित सामग्री