Tuesday, July 02, 2024 08:31:42 AM

अश्विनचा कसोटी महाविक्रम

अश्विनचा कसोटी महाविक्रम

विशाखापट्टणम, ०५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अटीतटीच्या दुसरा कसोटीचा चौथा दिवस सोमवारी (०५ फेब्रुवारी) असून लवकरात लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघाने लंचपर्यंत ६ बळी गमावले आहेत. यात तीन बळी आर अश्विनच्या नावे आहेत. अश्विनने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बेन डकेटला बाद करत संघाला सुवर्णसंधी मिळवून दिली. तर कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑली पॉपला बाद करत त्याने ४५ वर्षांपासूनचा एक विक्रम मोडित काढला आहे. आर अश्विन आता इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम भागवत चंद्रशेखर यांनी ४० वर्षांपूर्वी केला होता, तेव्हापासून हा विक्रम त्यांच्या नावावर होता पण आता अश्विनने त्याचा विक्रम मोडला असून तो स्वतः पहिल्या क्रमांकावर आला आहे.

इंग्लंडविरूध्द सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज -

९७ बळी – आर अश्विन
९५ बळी – बीएस चंद्रशेखर
९२ बळी – अनिल कुंबळे
८५ बळी – बीएस बेदी आणि कपिल देव
६७ बळी – इशांत शर्मा


सम्बन्धित सामग्री