Tuesday, July 02, 2024 08:20:20 AM

दुसऱ्या दिवसअखेर भारताला आघाडी

दुसऱ्या दिवसअखेर भारताला आघाडी

विशाखापट्टणम, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडवर १७१ धावांची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३९६ धावा केल्या. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक २०९ धावा केल्या. त्याने २९० चेंडूत सात षटकार आणि १९ चौकार मारत २०९ धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत आटोपला. भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने १५.५ षटकांत ४५ धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादवने तीन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला. भारताने दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल १५ तर कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1753744225706111000

विशाखापट्टणम : भारत - इंग्लंड दुसरी कसोटी
दुसऱ्या दिवसअखेर भारताला १७१ धावांची आघाडी
यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह चमकले

भारत पहिला डाव : सर्वबाद ३९६ धावा
भारत दुसरा डाव : बिनबाद २८ धावा
इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद २५३ धावा

भारत - इंग्लंड कसोटी मालिका - २०२४

पहिली कसोटी (२५ ते २९ जानेवारी) - हैदराबाद, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम - सकाळी ९.३० - इंग्लंडचा २८ धावांनी विजय
दुसरी कसोटी (२ ते ६ फेब्रुवारी) - विशाखापट्टणम, वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम - सकाळी ९.३०
तिसरी कसोटी (१५ ते १९ फेब्रुवारी) - राजकोट, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम - सकाळी ९.३०
चौथी कसोटी (२३ ते २७ फेब्रुवारी) - रांची, जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल - सकाळी ९.३०
पाचवी कसोटी (७ ते ११ मार्च) - धरमशाला, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम - सकाळी ९.३०


सम्बन्धित सामग्री