Sunday, July 07, 2024 12:30:29 AM

विशाखापट्टणममध्ये दुसरी कसोटी

विशाखापट्टणममध्ये दुसरी कसोटी

विशाखापट्टणम, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. इंग्लंडने पहिला सामना २८ धावांनी जिंकला. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना शुक्रवार २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विशाखापट्टणमच्या वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून भारत बरोबरी साधतो की इंग्लंड लागोपाठ दुसरा विजय मिळवतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.

रवींद्र जडेजा आणि केएल राहुलला दुसऱ्या कसोटीतून वगळले

रवींद्र जडेजा पहिल्या कसोटीत हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. केएल राहुल पहिल्या कसोटीत खेळला होता पण त्याच्या शरीराची उजवी बाजू वारंवार दुखत असल्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. वैद्यकीय चाचणीचा अहवाल तपासून बीसीसीआयने रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही खेळाडूंवर उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

भारत - इंग्लंड कसोटी मालिका - २०२४
पहिली कसोटी (२५ ते २९ जानेवारी) - हैदराबाद, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम - सकाळी ९.३० - इंग्लंडचा २८ धावांनी विजय
दुसरी कसोटी (२ ते ६ फेब्रुवारी) - विशाखापट्टणम, वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम - सकाळी ९.३०
तिसरी कसोटी (१५ ते १९ फेब्रुवारी) - राजकोट, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम - सकाळी ९.३०
चौथी कसोटी (२३ ते २७ फेब्रुवारी) - रांची, जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल - सकाळी ९.३०
पाचवी कसोटी (७ ते ११ मार्च) - धरमशाला, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम - सकाळी ९.३०

           

सम्बन्धित सामग्री