Tuesday, July 02, 2024 08:40:15 AM

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली, ०६ जून २०२४, प्रतिनिधी : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा टी-२० विश्वचषकाला शनिवारपासून (०१ जून) सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होणार असून ०१ जूनपासून क्रिडाप्रेमींना सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, स्पर्धेतील पहिला सामना कॅनडा आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. हा सामना डैलस येथील स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. तर भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारत-पाकिस्तान महामुकाबला ९ जून २०२४ रोजी खेळला जाणार आहे.

टी-२० विश्वचषकातील भारताचं वेळापत्रक

  • ५ जून - भारत विरुद्ध आयर्लंड
  • ९ जून - भारत विरुद्ध पाकिस्तान
  • १२ जून - भारत विरुद्ध अमेरिका
  • १५ जून- भारत विरुद्ध कॅनडा.

कोणता संघ कोणत्या गटात?

  • अ गट - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
  • ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
  • क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
  • ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

सम्बन्धित सामग्री