Tuesday, July 02, 2024 09:04:43 AM

केपटाऊन कसोटी दोन दिवसांत संपली

केपटाऊन कसोटी दोन दिवसांत संपली

केपटाऊन, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली. भारताने दुसरी तर दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकली. भारताने केपटाऊन कसोटी सात गडी राखून जिंकली तर दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरिअन कसोटी एक डाव आणि ३२ धावांनी जिंकली. मोहम्मद सिराज केपटाऊन कसोटीचा सामनावीर झाला तर जसप्रीत बुमराह आणि डीन एल्गर हे दोघे मालिकावीर झाले. दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात एक असे सात बळी घेतले.

https://twitter.com/BCCI/status/1742877107683053694

केपटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद ५५ तर दुसऱ्या डावात सर्वबाद १७६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात सर्वबाद १५३ आणि दुसऱ्या डावात ३ बाद ८० धावा केल्या. केपटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून २३ फलंदाज बाद झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून दहा फलंदाज बाद झाले.

           

सम्बन्धित सामग्री