Tuesday, July 02, 2024 08:35:35 AM

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत आटोपला

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत आटोपला

केपटाऊन, ३ जनेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली. मोहम्मद सिराजच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत गुंडाळला. भारताकडून सिराजने सहा तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करामने दोन, डीन एल्गरने चार, टोनी डी झॉर्झीने दोन, ट्रिस्टन स्टब्सने तीन, डेव्हिड बेडिंगहॅमने १२, काइल वेरेनेने १५, मार्को जॅन्सनने शून्य, केशव महाराजने तीन, कगिसो रबाडाने पाच, नांद्रे बर्गरने चार, लुंगी नगिडीने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव संपताच पंचांनी उपहारासाठी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/BCCI/status/1742488529131708816

दक्षिण आफ्रिकेला आघाडी

कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ – ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बुधवार ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे सुरू झाला आहे. नाणेफेक जिंकून या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला.

भारताच्या गोलंदाजाला दुखापत

अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या खांद्याला दुखापत झाली. फलंदाजीचा सराव करत असताना शार्दुलला ही दुखापत झाली. दुखापतीमुळे तो केपटाऊन कसोटीत खेळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शार्दुलच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.

आयसीसीने भारतावर केली कारवाई

षटके सावकाश टाकल्यामुळे अर्थात स्लो ओव्हररेटमुळे भारतावर आयसीसीने कारवाई केली. आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत मिळवलेल्या गुणांपैकी दोन गुण दंड म्हणून कमी केले. यामुळे भारताचे गुण आता १४ झाले आहेत. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार दक्षिण आफ्रिका १२ गुण आणि विजयाचे प्रमाण १०० टक्के असल्यामुळे पहिल्या स्थानावर आहे. भारत १४ गुण आणि विजयाचे प्रमाण ३८.८९ टक्के असल्यामुळे सहाव्या स्थानावर आहे.

                 

सम्बन्धित सामग्री