Thursday, March 27, 2025 04:28:56 PM

डेव्हिड वॉर्नरची माेठी घाेषणा

डेव्हिड वॉर्नरची माेठी घाेषणा

सिडनी, ०१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध तसेच सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्‍हणजे, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या निरोपाच्या कसोटी सामना खेळण्‍यापूर्वीच डेव्हिडने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

''पुढील वर्षी म्‍हणजे २०२५ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. मी दोन वर्षांच्या कालावधीत क्रिकेट खेळत राहिलो आणि चॅम्‍पियन्‍स ट्रॉफीवेळी ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघास सलामीवीराची आवश्‍यकता असेल, तर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेईन'', असेही वॉर्नर याने यावेळी जाहीर केले.

डेव्हिड वॉर्नर एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्द -

वॉर्नरने एकदिवसीय कारकिर्दीत १६१ सामन्यात ४५.३० च्या सरासरीने ६९३२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ९७.२६ होता. या सलामीच्या फलंदाजाने २२ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत. २००९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वॉर्नर हा रिकी पाँटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्यांमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

                 

सम्बन्धित सामग्री