Tuesday, July 02, 2024 08:53:23 AM

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला धक्का

कसोटी क्रिकेटमध्ये भारताला धक्का

केपटाऊन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ - ० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला, भारताचा दारूण पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारताला आणखी एक धक्का बसला.

षटके सावकाश टाकल्यामुळे अर्थात स्लो ओव्हररेटमुळे भारतावर आयसीसीने कारवाई केली. आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत मिळवलेल्या गुणांपैकी दोन गुण दंड म्हणून कमी केले. यामुळे भारताचे गुण आता १४ झाले आहेत.

आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार दक्षिण आफ्रिका १२ गुण आणि विजयाचे प्रमाण १०० टक्के असल्यामुळे पहिल्या स्थानावर आहे. भारत १४ गुण आणि विजयाचे प्रमाण ३८.८९ टक्के असल्यामुळे सहाव्या स्थानावर आहे.

                 

सम्बन्धित सामग्री