Saturday, July 06, 2024 10:58:35 PM

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

केपटाऊन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने १ - ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दररोज दुपारी दोन वाजता खेळ सुरू होणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. पण सामना अनिर्णित राहिला अथवा भारताचा पराभव झाला तर कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका जिंकेल. यामुळेच भारतासाठी दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कसोटीसाठी भारतीय संघात गोलंदाज आवेश खान याचा समावेश करण्यात आला आहे.

घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेसाठी आधी निवडण्यात आलेल्या मोहम्मद शमीला नंतर संघातून वगळण्यात आले. शमीची गैरहजेरी पहिल्या सामन्यात भारताला जाणवली. आता दुसऱ्या कसोटीत ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आवेश खानच्या माध्यमातून केला जाणार आहे. हा प्रयत्न किती यशस्वी होतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.

आवेशने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३८ सामने खेळून १४९ बळी मिळवले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सात वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत.

असा आहे भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू इश्वरन, आवेश खान


सम्बन्धित सामग्री