Saturday, July 06, 2024 11:00:11 PM

भारताचा पहिल्या कसोटीत दारूण पराभव

भारताचा पहिल्या कसोटीत दारूण पराभव

सेंच्युरियन, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि ३२ धावांनी विजय झाला. दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर सामनावीर झाला. त्याने २८७ चेंडूत १८५ धावा केल्या. यात २८ चौकारांचा समावेश होता. डीनला शार्दुल ठाकूरने केएल राहुलकरवी झेलबाद केले.

सेंच्युरियन कसोटीत नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद ४०८ धावा केल्या. यानंतर भारताचा दुसरा डाव १३१ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला.

पहिल्या कसोटीत विजय मिळवून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १ - ० अशी आघाडी घेतली. आता दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दररोज दुपारी दोन वाजता खेळ सुरू होणार आहे.

           

सम्बन्धित सामग्री