Saturday, July 06, 2024 11:18:49 PM

भारताचा पहिला डाव संपला

भारताचा पहिला डाव संपला

सेंच्युरियन, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरिअन येथे खेळवला जात आहे. या सामन्यातील भारताचा पहिला डाव संपला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावा केल्या. त्याने चौदा चौकार आणि चार षटकार मारले.

भारताकडून यशस्वी जयस्वालने १७ धावा, कर्णधार असलेल्या रोहित शर्माने ५ धावा, शुभमन गिलने २ धावा, विराट कोहलीने ३८ धावा, श्रेयस अय्यरने ३१ धावा, केएल राहुलने १०१ धावा, आर. अश्विनने ८ धावा, शार्दुल ठाकूरने २४ धावा, जसप्रीत बुमराहने १ धाव, मोहम्मद सिराजने ५ धावा, प्रसिद्ध कृष्णाने नाबाद शून्य धावा एवढे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने पाच, बर्गरने तीन तर जॅन्सन आणि कोएत्झीने प्रत्येकी एक बळी घेतला.

केएल राहुलने षटकार मारून केले शतक
दक्षिण आफ्रिकेत षटकार मारून शतक करणारा पहिला विदेशी फलंदाज
दक्षिण आफ्रिकेत षटकार मारून शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज

आशिया खंडाबाहेर शतक करणारे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज

ऋषभ पंत : चार शतके
विजय मांजरेकर : एक शतक
अजर रात्रा : एक शतक
वृद्धिमान साहा : एक शतक
केएल राहुल : एक शतक

दक्षिण आफ्रिका उपहारापर्यंत ४९ धावा

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत एक बाद ४९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम पाच धावा करून मोहम्मद सिराजच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला. डीन एल्गर २९ आणि टोनी डी झॉर्झी १२ धावांवर खेळत आहे.

           

सम्बन्धित सामग्री