Saturday, July 06, 2024 10:47:02 PM

भारत दक्षिण आफ्रिकेत जिंकणार ?

भारत दक्षिण आफ्रिकेत जिंकणार

सेंचुरियन, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबर २०२३ पासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवार २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी - २० मालिका बरोबरीत सोडवली. यानंतर झालेली एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने जिंकली. यामुळे भारतीय संघ कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवणार का, याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. जर यावेळी भारताने इतिहास बदलला तर भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक होईल. भारताने दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या २३ कसोटी सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकले आहेत. यामुळे यावेळी भारतीय क्रिकेटपटू काय करतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन - पावसामुळे रद्द
मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ - डकवर्थ लुईसनुसार दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून विजय
गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग - भारताचा १०६ धावांनी विजय
रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग - भारताचा ८ गडी राखून विजय
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून विजय
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल - भारताचा ७८ धावांनी विजय
मंगळवार २६ डिसेंबर २०२३ ते शनिवार ३० डिसेंबर २०२३ – पहिला कसोटी सामना, सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
बुधवार ३ जानेवारी २०२४ ते रविवार ७ जानेवारी २०२४ – दुसरा कसोटी सामना, न्यूलँड्स, केप टाऊन

आयसीसी क्रमवारी (२२ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या नोंदी)

टी - २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट : भारत - ६८ सामने - १८०४१ गुण - २६५ रेटिंग - पहिला क्रमांक
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट : भारत - ५८ सामने - ७०२० गुण - १२१ रेटिंग - पहिला क्रमांक
कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट : भारत - २९ सामने - ३४३४ गुण - ११८ रेटिंग - पहिला क्रमांक

           

सम्बन्धित सामग्री