Saturday, July 06, 2024 11:32:13 PM

निर्णायक सामन्यासाठी आमनेसामने

निर्णायक सामन्यासाठी आमनेसामने

पार्ल, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका पार्ल येथील बोलंड पार्कमध्ये निर्णायक सामन्यासाठी आमनेसामने आले आहेत. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी - २० मालिका बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेत १ - १ अशी बरोबरी झाली आहे. शेवटचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना पार्ल येथील बोलंड पार्कमध्ये सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

एकदिवसीय मालिका आणि निकाल

रविवार १७ डिसेंबर २०२३ - पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग - भारताचा ८ गडी राखून विजय
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ - दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून विजय
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ - तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल

तिसरा एकदिवसीय सामना

भारताचा संघ : केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिकेचा संघ : रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाड विलियम्स, ब्यूरन हेंड्रिक्स

           

सम्बन्धित सामग्री