Sunday, July 07, 2024 12:01:03 AM

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

दुबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली दुबईत सुरू असलेल्या खेळाडूंच्या लिलावावेळी लागली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सने २४ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावली. ही बोली लावत कोलकाताने स्टार्कला खरेदी केले. मिचेल स्टार्क हा आतापर्यंतच्या आयपीएलमधील सर्वात मोठ्या किंमतीला खरेदी झालेला खेळाडू ठरला. याआधी दुबईतल्याच लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने २० कोटी ५० लाख रुपये मोजले. कमिन्स हा आयपीएलमधील सर्वात मोठ्या किंमतीला खरेदी झालेल्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

कोणाला किती रक्कम मिळाली ?

वानिंदु हसारंगा- १.५० कोटी रुपये (सनरायजर्स हैदराबाद)
अजमतुल्लाह उमरजई- ५० लाख रुपये (गुजरात टायटन्स)
गेराल्ड कोएत्जी- ५ करोड़ रुपये (मुंबई इंडियन्स)
रचिन रवींद्र- १.८० कोटी (चेन्नई सुपरकिंग्स)
हैरी ब्रूक- ४ कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
ट्रेविस हेड- ६.८० कोटी रुपये (सनरायजर्स हैदराबाद)
रोवमैन पॉवेल- ७.४० कोटी रुपये (राजस्थान रॉयल्स)
पैट कमिंस- २०.५० कोटी रुपये (सनरायजर्स हैदराबाद)
शार्दुल ठाकुर- ४ कोटी रुपये (चेन्नई सुपरकिंग्स)
हर्षल पटेल- ११.७५ कोटी रुपये (पंजाब किंग्स)
डैरिल मिचेल- १४ कोटी रुपये (चेन्नई सुपरकिंग्स)
क्रिस वोक्स- ४.२० कोटी रुपये (पंजाब किंग्स)
ट्रस्टन स्टब्स - ५० लाख रुपये (दिल्ली कॅपिटल्स)
केएस भारत- ५० लाख रुपये (केकेआर)
चेतन सकारिया- ५० लाख (केकेआर)
अल्जारी जोसेफ- ११.५० कोटी (आरसीबी)
शिवम मावी- ६.४० कोटी रुपये (लखनऊ सुपर जायंट्स)
उमेश यादव- ५.८० कोटी रुपये (गुजरात टायटन्स)
मिचेल स्टार्क- २४.७५ कोटी रुपये (केकेआर)
दिलशान मदुशंका- ४.६० करोड़ (मुंबई इंडियन्स)
जयदेव उनाडदकट- १.६० करोड़ रुपये (सनरायजर्स हैदराबाद)


सम्बन्धित सामग्री