Tuesday, July 02, 2024 08:41:12 AM

मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत

मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत

नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची तयारी करत असलेल्या भारतासाठी एक काळजी वाढवणारी बातमी. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. शमी उपचार घेत आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना १० डिसेंबर रोजी आहे. पण मोहम्मद शमीचा समावेश फक्त कसोटी सामन्यांसाठी करण्यात आला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. यामुळे शमीला दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी आहे. या कालावधीत शमी दुखापतीतून सावरला तर दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. पण दुखापत बरी होण्यास वेळ लागणार असेल तर शमीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत होणार आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन
मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल
मंगळवार २६ डिसेंबर २०२३ ते शनिवार ३० डिसेंबर २०२३ – पहिला कसोटी सामना, सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
बुधवार ३ जानेवारी २०२४ ते रविवार ७ जानेवारी २०२४ – दुसरा कसोटी सामना, न्यूलँड्स, केप टाऊन

भारतीय संघ

टी – २० : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
एकदिवसीय : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, रजत पाटीदार, साई सुदर्शन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार, दीपक चहर.
कसोटी : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्ण, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.


सम्बन्धित सामग्री