Saturday, September 28, 2024 03:52:34 PM

पालघरमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला सुरुवात

पालघरमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला सुरुवात

पालघर, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पालघरच्या चिंचणी येथील के. डी. हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवारी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्हा खो-खो असोसिएशन क्रीडा मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. किशोर - किशोरी ३८ वी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत राज्यातील २३ जिल्ह्यांमधील ४६ संघांनी सहभाग घेतला आहे. चिंचणी येथील या खो-खो स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना १५ डिसेंबर रोजी कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. चिंचणी येथील खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पार पडले. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो खो-खो प्रेमींनी हजेरी लावली.


सम्बन्धित सामग्री