Tuesday, July 02, 2024 09:18:30 AM

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

गुवाहाटी, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने २२३ धावांचे मोठे आव्हान दिले. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले आव्हान पार करताना सामना अंतिम चेंडूपर्यंत नेला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज असताना शतकवीर ग्लेन मॅक्सवेलने चौकार मारत आपल्या संघाला महत्त्वाचा विजय मिळवून दिला. यामुळे या पाच टी २० मालिकेत विजय मिळवण्याची संधी पुढे ढकलली गेली.

ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत नाबाद आक्रमक अंदाजाने १०४ धावा ठोकल्या आणि सामनावीर ठरला. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड याने ५७ चेंडूत नाबाद १२३ धावांची खेळी केली होती. परंतू मॅक्सवेलच्या शतकीय खेळीमुळे गायकवाडचे शतक अयशस्वी ठरले.

भारतीय गोलंदाजांमध्ये रवि बिश्नोई सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३२ धावा देऊन दोन बळी घेतल्या. प्रसिद्ध कृष्ण हा अपयशी गोलंदाज ठरला. प्रसिद्धला चार षटकांत ६८ धावा खर्च करून ऑस्ट्रेलियाचा एकही बळी आपल्या नावावर करता आला नाही. अर्शदीप सिंह याने ४ षटकांत ४४ धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूला रवाना केले. आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी चार षटकांत प्रत्येकी ३७ धावा देत एक-एक बळी आपल्या नावावर केली.

महत्त्वाचे मुद्दे :

मॅक्सवेलच्या शतकीय आणि आक्रमक डावासमोर भारतीय गोलंदाज अयशस्वी
ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

              

सम्बन्धित सामग्री