Tuesday, July 02, 2024 08:19:18 AM

आयपीएलसाठी रोखीत होणार कोट्यवधींचा व्यवहार

आयपीएलसाठी रोखीत होणार कोट्यवधींचा व्यवहार

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या लवकरच मुंबई इंडियन्समध्ये खेळाडू म्हणून दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. तो रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्स रोखीने पंधरा कोटी रुपयांत खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सकडे पन्नास लाख रुपये शिल्लक आहेत. नियमानुसार आयपीएल २०२४ च्या लिलावात मुंबई इंडियन्सला आणखी पाच कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी मिळेल. थोडक्यात त्यांच्याकडे साडेपाच कोटी रुपये असतील. पण एवढ्या कमी रकमेत पांड्या संघात येणार नाही. यामुळे पंधरा कोटी रुपये मोजून खरेदी केलेला ईशान किशन तसेच आणखी काही खेळाडूंना संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. हार्दिक भविष्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. याआधी मुंबईकडून खेळाडू म्हणून आयपीएल खेळलेला हार्दिक गुजरात टायटन्समध्ये कर्णधार म्हणून सहभागी झाला. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघ सलग दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचला. यापैकी एकदा गुजरातने स्पर्धा जिंकली होती.


सम्बन्धित सामग्री