Saturday, July 06, 2024 11:33:52 PM

भारताची विजयी सलामी

भारताची विजयी सलामी

विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला वीस - वीस षटकांचा सामना दोन गडी राखून जिंकला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत तीन बाद २०८ धावा केल्या. भारताने १९.५ षटकांत आठ बाद २०९ धावा केल्या आणि सामना जिंकला.

सामनावीर - सूर्यकुमार यादव

भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी सलामी
वीस - वीस षटकांचा सामना जिंकला
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी
भारताने सामना २ गडी राखून जिंकला
ऑस्ट्रेलिया २० षटकांत ३ बाद २०८ धावा
भारत १९.५ षटकांत ८ बाद २०९ धावा

भारताची फलंदाजी

भारताने १९.५ षटकांत आठ बाद २०९ धावा केल्या आणि सामना दोन गडी राखून जिंकला.

ऋतुराज गायकवाड शून्य चेंडूत शून्य धावा करून धावचीत
यशस्वी जयस्वाल ८ चेंडूत २१ धावा करून मॅथ्यू शॉर्टच्या चेंडूवर स्टीव्हन स्मिथकडून झेलबाद (२ षटकार, २ चौकार)
ईशान किशन ३९ चेंडूत ५८ धावा करून तन्वीर संघाच्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टकडून झेलबाद (५ षटकार, २ चौकार)
तिलक वर्मा १० चेंडूत १२ धावा करून तन्वीर संघाच्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसकडून झेलबाद (२ चौकार)
सूर्यकुमार यादव ४२ चेंडूत ८० धावा करून जेसन बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर आरोन हार्डीकडून झेलबाद (४ षटकार, ९ चौकार)
अक्षर पटेल ६ चेंडूत २ धावा करून शॉन अॅबॉटच्या चेंडूवर त्याच्याकडूनच झेलबाद
रवी बिश्नोई एका चेंडूत शून्य धावा करून धावचीत
अर्शदीप सिंग शून्य चेंडूत शून्य धावा करून धावचीत
रिंकू सिंग १४ चेंडूत नाबाद २२ धावा (४ चौकार)
मुकेश कुमार नाबाद शून्य चेंडूत शून्य धावा

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी

नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत तीन बाद २०८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने ५० चेंडूत ११० धावा केल्या. जोशच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारणे सोपे झाले. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे वीस षटकांत २०९ धावा करण्याचे आव्हान ठेवले.

मॅथ्यू शॉर्ट ११ चेंडूत १३ धावा करून रवी बिश्नोईच्या चेंडूवर त्रिफळाचीत (३ चौकार)
स्टीव्हन स्मिथ ४१ चेंडूत ५२ धावा करून धावचीत (८ चौकार)
जोश इंग्लिस ५० चेंडूत ११० धावा करून प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालकडून झेलबाद (८ षटकार, ११ चौकार)
टीम डेव्हिड १३ चेंडूत नाबाद १९ धावा (१ षटकार, २ चौकार)
मार्कस स्टॉइनिस ६ चेंडूत नाबाद ७ धावा


सम्बन्धित सामग्री