Saturday, July 06, 2024 10:58:10 PM

ऑस्ट्रेलियाच्या 'जोश'मुळे भारतापुढे मोठे आव्हान

ऑस्ट्रेलियाच्या जोशमुळे भारतापुढे मोठे आव्हान

विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी - २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय भारताला भोवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत तीन बाद २०८ धावा केल्या आणि भारतापुढे वीस षटकांत २०९ धावा करण्याचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने ५० चेंडूत ११० धावा केल्या. जोशच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारणे सोपे झाले.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी

मॅथ्यू शॉर्ट ११ चेंडूत १३ धावा करून रवी बिश्नोईच्या चेंडूवर त्रिफळाचीत (३ चौकार)
स्टीव्हन स्मिथ ४१ चेंडूत ५२ धावा करून धावचीत (८ चौकार)
जोश इंग्लिस ५० चेंडूत ११० धावा करून प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालकडून झेलबाद (८ षटकार, ११ चौकार)
टीम डेव्हिड १३ चेंडूत नाबाद १९ धावा (१ षटकार, २ चौकार)
मार्कस स्टॉइनिस ६ चेंडूत नाबाद ७ धावा

           

सम्बन्धित सामग्री