Saturday, July 06, 2024 11:19:10 PM

सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार

सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार

विशाखापट्टणम, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदी तर व्हीव्हीएस लक्ष्मण याची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वीस - वीस षटकांच्या सामन्यांची मालिका
सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार

गुरुवार २३ नोव्हेंबर २०२३ - वायएसआर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम
रविवार २६ नोव्हेंबर २०२३ - ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुअनंतपुरम
मंगळवार २८ नोव्हेंबर २०२३ - बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी
शुक्रवार १ डिसेंबर २०२३ - विदर्भ असोसिएशन ग्राउंड, नागपूर
रविवार ३ डिसेंबर २०२३ - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

           

सम्बन्धित सामग्री