Tuesday, July 02, 2024 08:13:15 AM

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारताविरुद्धचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून जिंकला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ बाद २४१ धावा केल्या आणि अंतिम सामन्यासह विश्वचषक जिंकला.

लबुशेन नाबाद ५८ धावा (४ चौकार)
मॅक्सवेल नाबाद २ धावा

सामनावीर : टी. हेड, ऑस्ट्रेलिया । मालिकावीर : विराट कोहली, भारत

ऑस्ट्रेलियाने जिंकलेले विश्वचषक : २०२३, २०१५, २००७, २००३, १९९९, १९८७

https://twitter.com/cricketworldcup/status/1726267410053832824

भारताच्या पराभवाची प्रमुख कारणे

१. नाणेफेकीचा कौल भारताच्या विरोधात
२. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कामगिरी उंचावणे भारताला जमले नाही
३. मोठी भागीदारी रचणे आणि वेगाने धावसंख्या वाढवणे भारताला जमले नाही
४. ऑस्ट्रेलियाची चौथी जोडी तोडणे भारताला दीर्घ काळ जमले नाही

https://twitter.com/BCCI/status/1726268370960765061

असे बाद झाले ऑस्ट्रेलियाचे फलंदाज

१. डेव्हिड वॉर्नर ३ चेंडूत ७ धावा करून शमीच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
२. मिचेल मार्श १५ चेंडूत १५ धावा करून बुमराच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
३. स्टीव्हन स्मिथ ९ चेंडूत ४ धावा करून बुमराच्या चेंडूवर पायचीत (१ चौकार)
४. हेड १२० चेंडूत १३७ धावा करून सिराजच्या चेंडूवर गिलकडे झेल देऊन परतला (४ षटकार, १५ चौकार)

https://twitter.com/cricketworldcup/status/1726270805913280805

असे बाद झाले भारताचे फलंदाज

१. शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
२. रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
३. श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
४. विराट कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत (४ चौकार)
५. रवींद्र जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला
६. केएल राहुल १०७ चेंडूत ६६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
७. मोहम्मद शमी १० चेंडूत ६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
८. जसप्रीत बुमराह २ चेंडूत १ धाव करून झम्पाच्या चेंडूवर पायचीत
९. सूर्यकुमार यादव २८ चेंडूत १८ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
१०. कुलदीप यादव १८ चेंडूत १० धावा करून धावचीत


सम्बन्धित सामग्री