Tuesday, July 02, 2024 08:49:48 AM

ऑस्ट्रेलियाला झटपट तीन धक्के

ऑस्ट्रेलियाला झटपट तीन धक्के

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १५ षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या. याआधी भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या.

असे बाद झाले ऑस्ट्रेलियाचे फलंदाज

१. डेव्हिड वॉर्नर ३ चेंडूत ७ धावा करून शमीच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
२. मिचेल मार्श १५ चेंडूत १५ धावा करून बुमराच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
३. स्टीव्हन स्मिथ ९ चेंडूत ४ धावा करून बुमराच्या चेंडूवर पायचीत (१ चौकार)

असे बाद झाले भारताचे फलंदाज

१. शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
२. रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
३. श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
४. विराट कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत (४ चौकार)
५. रवींद्र जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला
६. केएल राहुल १०७ चेंडूत ६६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
७. मोहम्मद शमी १० चेंडूत ६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
८. जसप्रीत बुमराह २ चेंडूत १ धाव करून झम्पाच्या चेंडूवर पायचीत
९. सूर्यकुमार यादव २८ चेंडूत १८ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
१०. कुलदीप यादव १८ चेंडूत १० धावा करून धावचीत


सम्बन्धित सामग्री