Saturday, July 06, 2024 10:55:47 PM

ऑस्ट्रेलियासमोर माफक आव्हान

ऑस्ट्रेलियासमोर माफक आव्हान

कोलकाता, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील दुसरा एकदिवसीय सामना ईडन गार्डन्स स्टेडियम येथे सुरू आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ४९.४ षटकांत सर्वबाद २१२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत २ बाद ७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी उर्वरित ३९ षटकांत १३६ धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकणारा संघ भारताविरुद्ध रविवारी अंतिम सामन्यात खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ तर हेनरिक क्लासेनने ४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क आणि कर्णधार कमिन्स यांनी प्रत्येकी तीन तर हॅझलवूड आणि हेडने प्रत्येकी दोन बळी घेतले.


सम्बन्धित सामग्री